ऋषीतुल्य प्राचार्य डॉ गाढवे यांचे निधन
गेवराई- दि. 25(प्रतिनिधी )- येथील र भ अट्टल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ मारोतीराव गाढवे यांचे पुणे वाकड येथे अल्पशा आजाराने शुक्रवारी सकाळी आठ वाजता निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमई त्यांचे वय 75 वर्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी अट्टल कॉलेज, सुंदरराव सोळुंके कॉलेज माजलगाव येथेही प्राचार्य म्हणून उत्तम काम केले. ते बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व्यवस्थापन समितीचे सदस्य होते. प्राचार्य गाढवे यांचा स्वभाव शांत संयमी मितभाषी होता. अत्यंत विद्यार्थिप्रिय शिक्षक शिस्तप्रिय प्रशासक होते.त्यांनी गेवराईत मोठा संपर्क ठेवला होता. प्राचार्य गाढवे सर यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.