अवैध धंदे जोमात; तर पोलीस प्रशासन ‘हप्ता वसुली’ करण्यात मग्न..
नेकनुर पोलीस स्टेशन ने हप्ते गोळा करण्यासाठी पोसले होमगार्ड ?
बीड प्रतिनिधी – बीड जिल्हयातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारी नेकनुर आहे. रविवार दिवशी नेकनुर बाजारमध्ये शेतकरी आपले जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी येतात. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याकडून सुद्धा नेकनुर पोलीस स्टेशन चे कर्मचारी आणि तेथे असणारे होमगार्ड हे सर्रास पणे शेतकरी आणि व्यापारी वर्गाकडून हप्ते गोळा करताना पहायला मिळत आहेत. नेकनुर पोलीस स्टेशन या ठिकाणी ए. पी आय गोसावी साहेब रुजू झाल्यापासुन अवैध धंदे जोरात सुरु झाल्याचे सुध्दा पहायला मिळत आहेत. गुटखा विक्री आणि मटका, जुगार अड्डे वाढल्याचे आढळून येत आहे.
परिसरामध्ये अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. अशा धंद्याकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळाले आहे. यामुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनीच नाहरकत दिली की काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.