9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

मनुष्याने अहंकार नष्ट करावा म्हणजे सद्‌गुणी विचार अधिक बलवान होतात सहदेव महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन..

मनुष्याने अहंकार नष्ट करावा म्हणजे सद्‌गुणी विचार अधिक बलवान होतात सहदेव महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन..

जसे कर्म असते तसे फळं मिळत असते.

बीड प्रतिनिधी – प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री पंढरीस परमात्म्याच्या असिम कृपेने श्री बंकटस्वामी महाराज यांच्या सकल साधुसंताच्या आशीर्वादाने व श्री. ह. भ. प डॉ. महंत सहदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य श्री राधाकृष्ण मूर्तीप्राण प्रतिष्ठा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह राधाकृष्ण आश्रम मांडवजाळी येथे सुरू आहे. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सात दिवसीय संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन मंगळवार 23 एप्रिल ते मंगळवार 30 एप्रिल पर्यंत करण्यात आले आहे. दि. 26 एप्रिल रोजी राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि मुर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने ह.भ.प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे किर्तन संपन्न झाले. श्री. ह. भ. प डॉ. सहदेव महाराज शास्त्री यांची भव्य दिव्य अशी श्रीमद् भागवत कथा सुरू आहे या भगवत कथेच्या पाचव्या दिवशी महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना संदेश दिला. मनुष्याने अहंकार नष्ट करावा म्हणजे सद्‌गुणी विचार अधिक बलवान होतात. जसं कर्म असतं तसं फळ मिळतं असतं.मनाला सुमन बनवा म्हणजे भगवंत त्यात वास करेल. जीवन क्षणभंगुर आहे, हे प्रत्येकाला ज्ञात होऊनही हाव सुटत नाही. श्रीमद भागवत गीता श्रवण केल्यामुळे मानसिक शांती देत असून मनाला सर्वोच्च शक्तीशी जोडण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. आपण शांत आणि चांगले जीवन कसे जगू शकतो याचा धडाही भागवत गीतेत आहे. भागवत गीतेत जीवन जगण्याची अनेक सूत्रे आहेत.

 

भगवद्गीतेची सूत्रे आपल्याला आपल्या कार्यात कार्यक्षमतेने, शांत मनाने आणि दृढ मनाने जीवन कसे जगावे हे सांगते. माणसाने आपले मनोबल कधीही ढासळू देऊ नये. उदास मनामुळे शरीरही कोलमडते. गीता मनोबल वाढवते. महापुरुषांचे चरित्र समोर ठेवून मनोबल वाढवा आणि चंचल मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत सराव करायला शिकवा भगवंताच्या नावात तल्लीन होणे हेच संताचे स्थान आहे. राजाची भुमिका बजावल्या नंतर मानवाला राजा ही बनता येते असे यावेळी महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले. तसेच सप्ताहात मंगळवार 23 एप्रिल रोजी सकाळी ह.भ.प गुरुवर्य तुकाराम महाराज शिंदे यांच्या हस्ते कलशाची स्थापना करण्यात आली. मंगळवार 30 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी ६ ते ७ वाजता पर्यंत काकडा, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथा, सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात तरुण, महिला, ज्येष्ठ, महिला यांनी उत्कृष्ठ सहभाग दर्शवित आहे. मंगळवार 30 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत श्री. ह.भ.प. गुरूवर्य तुकाराम महाराज शिंदे अध्यक्ष कोकणस्थ मराठा धर्मशाळा आळंदी दे. यांचे अमृतमूल्य काल्याचे किर्तन होईल .त्यानंतर महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प डॉ. सहदेव महाराज शास्त्री आणि मांडवजाळी गावकऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!