9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

देशाची सर्वात श्रीमंती या देशाची स्त्री आहे बाळू महाराज गिरगावकर यांचे प्रतिपादन..

देशाची सर्वात श्रीमंती या देशाची स्त्री आहे बाळू महाराज गिरगावकर यांचे प्रतिपादन..

आईने आपल्या घातलेली मिठी सर्वात श्रेष्ठ आहे. 

गुरुवर्य स्वामींचा जन्म नसताना तर 75 टक्के कीर्तनकार नसते.

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या कृपेने व वै ह.भ.प गिरी महाराज व ज्ञानेश्वर माऊली, सुदामदेव महाराज, गुरुवर्य शांती ब्रह्म रामहरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे व महादेव महाराज (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्या वतीने- गुरुनाम गुरु वै. प्रात स्मरणीय बंकट स्वामी महाराज यांचे शिष्य वै गुरुवर्य सुदामदेव महाराज यांनी सुरू केलेला 71 वा फिरता नारळी सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या चौथा दिवसाचे कीर्तन पुष्प ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांचे संपन्न झाले.

हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥

ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥

करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥

तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥

भक्त प्रल्हादाने आर्ततेने नारायणाला हाक मारताच नारायण स्तंभ फोडून स्तंभातून प्रकट झाले.अशी कृपावंत माऊली माझ्या विठाई माऊलीहून दुसरी कोण आहे?तिचे स्मरण करताच प्रेमाने धावत येऊन ती भक्ताला मिठी मारते. तुकाराम महाराज म्हणतात हरीचेनाम गीतात आळवावे.त्याने सायुज्य मुक्ती मिळते.आईने आपल्या घातलेली मिठी सर्वात श्रेष्ठ आहे. सात्विक परंपरा सदाचारी परंपरा सद्गुरू स्वामी महाराजांची परंपरा वारकरी सांप्रदायिक आधारवड आहेत. गुरुवर्य स्वामींचा जन्म नसता तर 75 टक्के कीर्तनकार नसते.

आम्ही फार दिवसापासून हाका मारतो पण अजून आमच्याकडे देव आलेला नाही. जर हाक मारून देव तुमच्याकडे येत नसेल तर मग तुम्ही तुमचा दर्जा तपासा, तुमची लायकी तपासा, तुमचा अधिकार तपासा,तुमची वैचारिक पातळी तपासा.तुमच्या हाकेला देव येत नाही त्या अर्थी तुम्ही सांप्रदायातले आदर येऊ नही तुम्ही निष्ठेने सांप्रदाय करत नाहीत हे तितकच खरे आहे. तुम्ही त्या मालकाचे भक्त नाहीत हेही तितकच खरे आहे. हाक मारायची असेल तर दर्जा लागतो, कोणत्याही जातीच्या माणसाने हाक मारू द्या हाक मारणारा दर्जेदार असायला पाहिजे. दर्जेदार हाक मारली की देव नक्कीच येतो.

उपवास धरून नाहीत ते उपवास धरायला लावली.. आपल्याकडे फक्त 29 उपवास सांगितले 24 एकादशी आणि पाच परवनी आणि अर्धा उपवास सांगितलं सोमवार याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकही उपाय सांगितलेला नाही.सर्पाच्या माथेवरचा मनी जर पाहिजे असेल तर मरेपर्यंत मिळतं नाही. संगती चांगल्याची करावी, संगती चांगल्याची असावी, आपल्या जीवनात सोबत हा चांगला व्यक्ती ठेवावा, संगत ही चांगल्याची करावी. महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले आणि परस्त्री ही आपल्या आई समान असते स्त्री ची महिमा काय असते असे  महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना संदेश दिला.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!