27.1 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी..

बीडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी.. 

बीड प्रतिनिधी – बीड मध्ये एकमेकांचे शेजारी असणाऱ्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील जवळपास पंधरा जण जखमी असून ९ जण गंभीर जखमी आहेत तर इतर किरकोळ जखमी आहेत. सदरील घटना आज शुक्रवारी (दि.१२) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातील रहिवासी शिंदे आणि कांबळे हे दोन कुटुंब शेजारी रहातात. हे दोन्ही गट आमनेसामने आले यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्या, दगडाने मारहाण झाल्याने यात नऊजण गंभीर जखमी झाले. सहा ते सात जण किरकोळ जखमी आहेत. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविल्याने मोठा अनर्थ टळला. तातडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दाखल करताच उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्व रक्ताने माखलेला अवस्थेत आल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. पेठ बीड पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून जखमींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सदरील घटना जागेच्या वादातून घडल्याची चर्चा आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!