आगामी निवडणुकीत आपल्या प्रश्नांचा राजकीय पुढार्यांना जाब विचारा- प्रा.मिलींद आवाड
- आगामी निवडणुकीत आपल्या प्रश्नांचा राजकीय पुढार्यांना जाब विचारा- प्रा.मिलींद आवाड
- माजलगावात उसतोड कामगार हक्क परिषद..
- झालेली 34 टक्के भाववाढ न दिल्यास कामगारांचा मोर्चा काढणार – राजेश घोडे
- माजलगाव, प्रतिनिधी : शेतकरी, कष्टकरी, शेतमजुर, उसतोड कामगार यांचे शिक्षण, आरोग्य आदी मुलभुत प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. परंतु या लोकांची मते राजकीय पुढारी गृहीत धरतात तेंव्हा या राजकीय पुढा-यांना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आगामी निवडणुकीत आपल्या प्रश्नांचा जाब विचारा असे आवाहन मानवी हक्क अभियानचे राष्ट्ीय अध्यक्ष प्रा. डॉ. मिलींद आवाड यांनी केले तर उसतोड कामगारांच्या प्रश्नांना आम्ही वा-यावर सोडणार नाहीत. झालेली 34 टक्के भाववाढ न दिल्यास उसतोड कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा इशारा उसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी दिला आहे.
- माजलगाव प्रतिनिधी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात कर्मविर एकनाथराव आवाड उसतोड कामगार संघटना व मानवी हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 मार्च 2024 रोजी दु. 1.00 वा. आयोजित उसतोड कामगार हक्क परिषदेत ते बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थांनी प्रा. डॉ. मिलींद आवाड हे तर उद्घाटक म्हणुन राजेश घोडे होते. दयानंद स्वामी, मुसद्दीक बाबा, तुकाराम येवले, मोहन जाधव, अॅड. नारायण गोले, शिवाजी सुतार, धम्मानंद साळवे, विष्णु मुजमुले, महादेव उमाप, बाबासाहेब मुजमुले, मधुकर कांबळे, बबन मांजरे, कैलास आडागळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना आवाड म्हणाले की, उसतोड कामगार संघटनेमध्ये कारखानदारांच्या काही संघटनांनी शिरकाव केल्यामुळे उसतोड कामगारांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही परंतु कर्मविर एकनाथ आवाड उसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातुन राज्यातील उसतोड कामगारांचे प्रश्नांवर लोकशाही मार्गाने तिव्र लढा उभारून प्रश्न सोडविण्यात येतील. तेंव्हा उसतोड कामगारांनी आपली ताकत संघटनेच्या पाठीशी उभी करावी असे आवाहन केले. या परिषदेमध्ये पाचशे रूपये टनाप्रमाणे उसतोड मजुरांना भाव मिळाला पाहिजे, प्रत्येक उसतोड कामगारांचा विमा उतरविला पाहिजे, कारखान्याने शाळा, आरोग्य, सुरक्षा पुरवा, 34 टक्के झालेली भाववाढ याच हंगामात उसतोड कामगारांना द्यावी हे ठराव मंजुर करण्यात आले. यावेळी दयानंद स्वामी, तुकाराम येवले, धम्मानंद साळवे, मुसद्दीक बाबा, विष्णु मुजमुले, मोहन जाधव, अॅड. नारायण गोले, मधुकर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेश खंडागळे यांनी केले. सुत्रसंचालन महादेव उमाप तर आभार तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुजमुले यांनी मानले.
error: Content is protected !!