- बँकेतील ठेवीदारांचे पैसे दया:,तरच उपोषण मागे घेणार-सचिन उबाळे
- -जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदारांचे उपोषण सुरूच..
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,12 : ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम यासह इतर मल्टिस्टेट बँकेने ठेवीदारांचे पैसे अद्यापही दिलेले नाहीत. ठेवीसाठी गेल्या चार दिवसांपासून सचिन उबाळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी अनेक ठेवीदार कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहेत. जोपर्यंत पैशाचा निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्णय उबाळे यांनी घेतला आहे.
- ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम यासह इतर मल्टिस्टेट बँकेत ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. मल्टिस्टेटवाले फक्त आश्वासन देत आहेत. ठेवीदारांचे पैसे तात्काळ द्यावे या मागणीसाठी चार दिवसांपासून सचिन उबाळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून जोपर्यंत पैशाचा निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा उबाळे यांनी घेतला आहे. उबाळे यांंच्या उपोषणाला अनेक ठेवीदारांनी पाठिंबा दर्शवला असून तेही ठिय्या मांडून बसले आहेत.