9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील विहिरीचे संरक्षक कठडे अपघातात तुटलेले ३ महिने झाले ; कंत्राटदाराचे दुर्लक्ष ; अपघाताचा संभाव्य धोका :- डॉ.गणेश ढवळे

  • अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील विहिरीचे संरक्षक कठडे अपघातात तुटलेले ३ महिने झाले ; कंत्राटदाराचे दुर्लक्ष ; अपघाताचा संभाव्य धोका :- डॉ.गणेश ढवळे
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे

    लिंबागणेश:- बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट दर्जाचे बांधा,टोलनाके सुरू करून पैसे कमवा आणि देखभाल दुरुस्ती मात्र विसरून जा अशी धारणा कंत्राटदारांची सर्रास दिसून येत आहे. देखभाल करण्याच्या ५ वर्षें कालावधीत दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते मात्र याकडे दुर्लक्ष करून सामाजिक कार्यकर्ते यांनी वरिष्ठ कार्यालयास लेखी निवेदनाद्वारे तक्रार केल्यानंतर सर्वकाही आलबेल असुन दुरूस्ती करण्यात आल्याचे पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयास करुन कंत्राटदार नामानिराळे राहताना दिसुन येत असुन असाच प्रकार अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी वरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान मुळुकवाडी गावाजवळ विहिरीचे संरक्षण कठडा ३ महिन्यांपूर्वी अपघातात तुटलेला असताना अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आली नसुन भविष्यात याठिकाणी अपघात झाल्यास कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई आणि अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना केली आहे.
  • ३ महिन्यापुर्वी अपघातात संरक्षण कठडे तुटले अजुन दुरुस्ती नाही:- पांडुरंग ढास ( मुळुकवाडी ग्रामस्थ)

    मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान या महामार्गावर ३ महिन्यांपूर्वी स्विफ्ट गाडी संरक्षण कठड्याला धडकुन उलटी झाली होती.७० फुट खोल असलेल्या विहिरीला वारंवार अपघात होतात म्हणून संरक्षक कठडा बांधण्यात आलेला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून याची दुरूस्ती करण्यात आली नसुन भविष्यात अपघातात जिवितहानी टाळण्यासाठी लवकरात लवकर संरक्षक कठडा बांधणे गरजेचे आहे.
  • मधुकान – श्रीहरी – घुले कन्स्ट्रक्शन कडुन वरिष्ठांची दिशाभूल:- डॉ.गणेश ढवळे

    अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते चुंभळीफाटा ३३ किलोमीटर लांबीच्या १६६ कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मधुकान – श्रीहरी – हुले कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आले आहे. कंत्राटदाराचे देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष असुन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता मुंबई, अधिक्षक अभियंता व उपअभियंता छत्रपती संभाजीनगर वरिष्ठ कार्यालयास लेखी तक्रार केल्यानंतर मात्र वरिष्ठ कार्यालयास कंत्राटदार वेळोवेळी दुरुस्ती करत असल्याचे कळवुन दिशाभूल करताना दिसत आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!