27.1 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड येथील इशारा सभेला करोडोंच्या संख्येने उपस्थित रहा – मराठा सेवक अनिलदादा जगताप

  • बीड येथील इशारा सभेला करोडोंच्या संख्येने उपस्थित रहा – मराठा सेवक अनिलदादा जगताप
  • ===============
  • बीड, प्रतिनिधी- महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण २४ डिसेंबर पर्यंत देऊ असे आश्वासन दिलेले आहे. मात्र सरकार मराठा समाजाला सरसकट ५० टक्के प्रवर्गातील आरक्षण देण्याच्या धोरणात दिसत नाही त्यामुळे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे विराट निर्णायक इशारा सभा शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३रोजी पाटील मैदान छञपती संभाजी महाराज चौक, बीड-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. याचबरोबर सभे आगोदर शहरातून भव्य रॅली सुद्धा निघणार आहे. आपले मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या पाटील मैदान छञपती संभाजी महाराज चौक, बीड-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग येथे आयोजित केलेल्या मराठा निर्णायक इशारा सभेसाठी बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी करोडोंच्या संख्येने आपल्या परिवारासह उपस्थित रहावे असे आवाहन अनिलदादा जगताप यांनी केले आहे तसेच आपल्या मराठा इशारा सभेला गालबोट लागू नये यांची काळजी प्रत्येकाने घ्यावी. अनिलदादा जगताप यांनी असे म्हटले आहे की, सर्वांनी राजकीय मतभेद विसरून या सभेसाठी उपस्थित रहावे. ही सभा मराठा समाजाची आपल्या आरक्षणासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यसाठी, आपल्या न्याय हक्कासाठी ही मराठ्यांची इशारा सभा आहे तरी बीड येथे पाटील मैदान छञपती संभाजी महाराज चौक, बीड-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग येथे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी २३ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बीड जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधवांनी करोडोंच्या संख्येने सह पारिवार उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजा तर्फे मराठा सेवक अनिलदादा जगताप यांनी केले आहे.
  • सभे अगोदर भव्य रॅलीचे आयोजन..
  • बीड नगरीत संपन्न होत असलेल्या निर्णायक इशारा सभे अगोदर भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली पेठ बीड येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सुभाष रोड मार्गे पुढे निघेल. त्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना वंदन करून जालना रोड मार्गे पुढे निघेल नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन बार्शी रोड मार्गे सभास्थळी पाटील मैदान छञपती संभाजी महाराज चौक, बीड-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग येथे पोहचेल. त्यामुळे सकल मराठा बांधवांनी सकाळी १०:०० वा. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ यावे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!