24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

कांबी मंजरा‌ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेख‌ अखतरबी‌ फत्तू मामु‌ विजयी.!

 

  • कांबी मंजरा‌ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेख‌ अखतरबी‌ फत्तू मामु‌ विजयी.!
  • गेवराई : गेवराई तालुक्यातील अत्यंत चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उपसरपंदाच्या‌ निवडणूकीत शिवसेनेच्या शेख‌ फत्तू‌ मामु‌ यांनी आपला‌ उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर विरोधी गटातून सुनिता विजय पवार या‌ उमेदवार होत्या. सदरील निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे संपन्न झाली.या मध्ये शेख‌ आखतरबी‌ फत्तू‌ मामु‌ यांना १० सदस्यांपैकी ८ मते‌ मिळाली तर‌ सुनिता विजय पवार यांना अवघे‌ २ मते‌ मिळाल्याने त्या पराभूत झाल्या‌ तर‌ शेख‌ आखतरबी‌ फत्तू‌ मामु‌ हे‌ बहुमताने विजयी झाल्यामुळे नंदपूर‌ कांबी‌ ग्रामपंचायतील‌ गावकऱ्यांनी जल्लोष केला.
  • लोकनियुक्त सरपंच शाम‌ मुळे‌ व नवनियुक्त उपसरपंच शेख‌ फत्तू मामू‌ यांनी आगामी काळात नंदपूर‌ कांबी‌ ग्रामपंचायतीचा विकास‌ कामातून कायापालट करू‌ असा‌ निर्धार केला.यावेळी माजी‌ चेअरमन रामेश्वर जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रसेन उबाळे, संगीता चंद्रसेन उबाळे, माजी ग्रा‌.प.सदस्य गोरख‌ उबाळे, माजी ग्रा‌.प.सदस्य काशिनाथ अडागळे‌, मोहन‌ उबाळे, कलंदर‌ शेख‌, माणिक उबाळे, अशोक उबाळे, अनंत उबाळे, भानूदास‌ वाव्हळ‌, दत्तू उबाळे, हारून शेख‌, संदीप उबाळे, ईक्तरभाई‌ शेख, ईस्ताक‌ शेख‌, शेख फारूख, शेख‌ जहीद‌, तसेच कांबी‌ मंजरा‌ ग्रामपंचायतीच्या विभागातील‌ असंख्य गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!