19 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

वडवणीत रेणुकामाता संस्थानाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार संपन्न.!

  • वडवणीत रेणुकामाता संस्थानाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार संपन्न.!
  • जनसामान्यांचे प्रश्न घेवून सरकारलाही घाम फोडणाऱ्या पत्रकारांचा अभिमान – अण्णा महाराज दुटाळ
  • वडवणी,दि.२१(प्रतिनिधी) सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम सुरु असून वडवणी येथील समस्त वडवणीकरांची आराध्य दैवता असलेल्या श्री.रेणुकामाता संस्थान परिसर देखील भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. याच नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने श्री.रेणुकामाता संस्थान यांच्या वतीने काल दि.२० ऑक्टोंबर २०२३ शुक्रवार रोजी वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा गौरव सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना त्यांच्या पत्रकारितेच्या सामाजिक दायित्वाला उत्तरोत्तर बळ लाभावे यासाठी श्री.रेणुकामाता चरणी प्रार्थना करण्यात आली.
  • याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरु असून वडवणी येथील समस्त वडवणीकरांची आराध्य दैवता श्री.रेणुकामाता संस्थान परिसर देखील भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. या ठिकाणी दैनंदिन भाविक हे श्री.रेणुका मातेचे मनोभावे दर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून सकाळी ७ वा. व सायंकाळी ७ वा. आरतीच्या वेळी होणारी गर्दी लक्षणीय असते. याच नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने श्री.रेणुकामाता संस्थान यांच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या संस्थानाचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ यांच्या संकल्पनेतून संस्थानाच्या वतीने समाजात जनजागृती करणारे व सामाजिक प्रश्नांना फोडून जनसामान्यांना न्याय मिळवून देणारे आणि चौथा स्तंभ म्हणून ज्यांना गौरविले जाते अशा वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या गौरव सत्कार समारंभाचे आयोजन काल दिनांक २० ऑक्टोंबर २०२३ शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजता मातेच्या आरतीनंतर करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंकुशराव शिंदे पाटील, सुप्रसिध्द वैद्यकीय तज्ञ डॉ.भाऊसाहेब पुर्भे, डॉ.शंकर वाघ, पुरोहीत प्रमोद देवा जोशी, युवा उद्योजक विशाल पतंगे, विवेक पतंगे, ह.भ.प.आंधळे महाराज, यांसह इतर भाविक गण उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, संपादक अनिल वाघमारे, संपादक सतिश वाघमारे, संपादक जानकीराम उजगरे, पत्रकार बाबुराव जेधे, पत्रकार विनायक जाधव, पत्रकार विनोद जोशी, पत्रकार सुधाकर शिंदे, पत्रकार सुधाकर पोटभरे, पत्रकार अविनाश मुजमुले, पत्रकार जगदीश गोरे, पत्रकार सतिश मुजमुले, पत्रकार रामेश्वर गोंडे, पत्रकार भैय्यासाहेब तांगडे, पत्रकार ज्ञानेश्वर लंगे, पत्रकार महेश सदरे, पत्रकार बप्पासाहेब भांगे, पत्रकार लहू खारगे, पत्रकार अशोक फपाळ, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार श्रीनिवास काकडे, पत्रकार विघ्नेश जोशी, महिला पत्रकार गितांजली लव्हाळे यांसह अन्य मान्यवर व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थानाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना त्यांच्या पत्रकारितेच्या सामाजिक दायित्वाला उत्तरोत्तर बळ लाभावे याकरिता श्री.रेणुकामाता चरणी प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर वाव्हळ यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शेवटी सर्व उपस्थितांचे आभार अण्णा महाराज दुटाळ यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.रेणुकामाता संस्थानचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ, ज्येष्ठ नेते शिवाजीराव दादा दुटाळ, राहुल दुटाळ, बाळासाहेब दुटाळ, परशुराम दुटाळ, दिपक दुटाळ, गोविंद दुटाळ यांसह आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!