19 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

बीड जिल्ह्याचा यश जाधव भारतीय रग्बी संघात..

  • बीड जिल्ह्याचा यश जाधव भारतीय रग्बी संघात..
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
  • बीड दि,3 : – बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने जिल्ह्यात मागील 10 वर्षापासून या खेळाचा प्रचार,प्रसार सर्व सामान्य खेळाडूंपर्यंत करण्यात येत आहे. गत ४ वर्षापासून त्यास जिल्ह्यातील खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यातील पालक खेळाडू आणि प्रशिक्षक हे सातत्याने खेळामध्ये सुधारणा करत आहेत. गत दोन वर्षापासून जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य पदके प्राप्त करून राज्यात दबदबा निर्माण केला आहे.राज्य स्पर्धेतील सातत्याच्या कामगिरीने जिल्ह्यातील 10 खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. यश जाधव सतत दोन राष्ट्रीय शिबिरांत सहभागी झाला होता.मागील वर्षी 18 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची निवड थोडक्यात हुकली परंतु या वर्षी १८ वर्षाखालील संघात आज बीड जिल्ह्यातील यश बालासाहेब जाधव रा. लिंबागणेश ता. जि. बीड या खेळाडूची भारतीय रग्बी संघात निवड झाली आहे.
  • आशियाई रग्बी स्पर्धा तैवान तैईपेयी येथे दिनांक 30 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होत आहेत.
  • याकरिता भारतीय संघाची निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर भुवनेश्वर ओडीसा येथे अखिल भारतीय रग्बी युनियन यांच्यामार्फत सुरू असून, देशभरातून ३० खेळाडूंची प्रशिक्षण शिबिरा करता निवड करण्यात आलेली होती. यामधून, 14 खेळाडूंचा संघ अखिल भारतीय रग्बी फुटबॉल युनियन यांच्यातर्फे आशियाई स्पर्धेसाठी आज जाहीर करण्यात आला.
  • यामध्ये बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचा खेळाडू यश बालासाहेब जाधव याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झालेली आहे. यश जाधव हा बीड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत खेळणारा पहिलाच खेळाडू आहे.तो रग्बीचा सराव रोज सायंकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत मोरया क्रीडा मंडळ, नाट्यगृहा जवळ , गर्गे स्मारकासमोरील मैदानावरती नियमित वर्षभर करतो.
  • बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्या वतीने यशचे अध्यक्ष इसाक शेख, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, सचिव महेश घुले, कार्याध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे सर,तसेच प्रशिक्षक अशोक चौरे आणि शोएब खाटीक तसेच भगवानराव बागलाने,दादासाहेब बागलाने, शिवराज देवगुडे, सतीश उबाळे यांनी अभिनंदन करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!