पक्ष, राजकारण बाजूला सारून मराठा आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने सदैव उभा राहणार- अनिलदादा जगताप
- पक्ष, राजकारण बाजूला सारून मराठा आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने सदैव उभा राहणार- अनिलदादा जगताप
- विविध मराठा आंदोलनकर्त्यांना अनिलदादा जगताप यांचा पाठिंबा..
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,९ : मराठा समाजाला आरक्षण हवे या मागणीची धग आता मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे. मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा हा नारा देत सुरू केलेला आरक्षणासाठीचा लढा मूक मोर्चा ते आता आमरण उपोषणापर्यंत आला आहे. आमरण उपोषण सुरू केलेल्या जरांगे पाटलांना आता हळूहळू महाराष्ट्रभरातील मराठा समाज समर्थन देत असून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठ्यांनी एकजूट करत आता तालुका व जिल्हा पातळीवर महाराष्ट्रभरात आंदोलन उपोषण करण्यास सुरुवात केलेली आहे. याच मालिकेत काल दि. ९ सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा सकल मराठा शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी समितीच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. यामध्ये मराठा समाजातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. दरम्यान बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी या आंदोलनात सहभागी होऊन सकल मराठा शिक्षक ,प्राध्यापक, कोचिंग क्लासेस प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीचे पाठिंबा दिला. पक्ष राजकारण बाजूला सारून भर पावसात शिक्षकांच्या पाठीशी अनिलदादा जगताप या आंदोलनात उभारले.
- गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी विविध आंदोलने उभारण्यात आली तर काही मराठा बांधवांनी स्वतः अमरण उपोषण सुरु केले. यापैकी केतुरा येथील विठ्ठल नामदेव रहाणे, वांगी येथील महादेव शेळके पाटील आणि कुटेवाडी येथील नंदकुमार अंकुशराव कुटे यांनी आमरण उपोषण सुरु केले. या सर्व ठिकाणी अनिलदादा यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन पाठिंबा दिला. यानंतर बीड जिल्हा वकील संघाचे लाक्षणीक उपोषण करण्यात आले. याठिकाणी देखील अनिलदादा यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा सकल मराठा शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी समितीच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याठिकाणी देखील अनिलदादा जगताप यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
- मराठा समाजाने आजवर सामाजिक सलोखा जपत शिस्तीचे प्रदर्शन करून लोकशाही मार्गाने आंदोलने केली व करत आहेत. यापुढेही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ही आंदोलने सुरूच राहितील वेळेप्रसंगी सरकार ठिकाण्यावर आणण्यासाठी योग्य ते पाऊलही उचलल्या जाणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता मराठा शांत होणार नाही. आता मराठ्यांना आरक्षण हवे या मागणीची धग आता मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे सर्व क्षेत्र, संघटना एकजूट होऊन पूर्ण ताकदीने आंदोलने करत आहेत. यादरम्यान मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करा पण कोणीही आत्महत्या करण्यासाठी पाऊल उचलू नका किंवा त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नका. माझा सर्व मराठा बांधवांना, आंदोलनकर्त्यांना, संघटनांना पक्ष राजकारण सोडून जाहीर पाठिंबा असल्याचे वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा यांनी केले.
error: Content is protected !!