26 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

मनोज जरांगे यांचे आईला पाहून अश्रु अनावर…

मनोज जरांगे यांचे आईला पाहून अश्रु अनावर…

माझ्या बाळाला न्याय द्या. मनोज जरांगे यांच्या आईची सरकारला विनंती…

बीड प्रतिनिधी -गेल्या अकरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटिल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या मातोश्री मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या त्याप्रसंगी आईला पाहून मनोज जरांगे यांना अश्रु अनावर झाल्याचे पहायला मिळाले.

आरक्षणासाठी दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण अद्यापही सोडलेलं नाही. निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहेत त्यांना आम्ही मराठा-कुणबी, कुणबी-मराठा असं जात प्रमाणपत्र देऊ असा शासन आदेश सरकारने काढला, तसंच मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली.

मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आज त्यांच्या आईने पु्न्हा एकदा आंदोलन स्थळी येऊन आपल्या भावना बोलून दाखवल्या. माझ्या बाळाने दहा दिवसांपासून अन्न पाणी घेतलेलं नाही त्याला न्याय द्या असं मनोज जरांगे पाटील यांच्या आई म्हणाल्या आहेत. हे बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. तसंच मनोज जरांगे पाटीलही भावूक झाले.

काय म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आईने?

“दहा दिवसांपासून माझा बाळ लढतो आहे, त्याने अन्न-पाणी काहीही घेतलेलं नाही. त्याला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या बाळासाठीच नाही सगळ्याच बाळांसाठी आरक्षण द्या अशी मागणी मी करते आहे. “

मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जेव्हा त्यांची आई आली तेव्हा त्यांनी पायावर डोकं ठेवून आईला नमस्कार केला आणि आईने ही कल्याण होऊदेत तुझं म्हणत आशीर्वाद दिला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आईला दोघांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी आज मराठा समाज पेटून उठला आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“माझीच आई नाही, प्रत्येक घरातली आई माझ्या पाठिशी आहे. यापुढे मी मराठा आरक्षणासाठी एकही मुडदा पडू देणार नाही. मराठ्यांची मान खाली होऊ देणार नाही. माझं गाव, माझं राज्य माझ्या मागे उभं राहिलं आहे मला याचा प्रचंड अभिमान वाटतो आहे. मी माझ्या गावाच्या ऋणात आहे. महाराष्ट्रातला मराठा समाजही माझ्या मागे उभा राहिला त्यामुळे मी धन्य झालो. इथे आलेल्या सगळ्या बांधवांना मी एकच सांगतो की तुमची शक्ती, तुमची ताकद ही कोट्यवधी मराठ्यांच्या पोरांच्या कल्याणासाठी वापरणार आहे. मी माझ्या समाजाशी कायमच प्रामाणिक राहिलो आहे, यापुढेही राहणार आहे.” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!