बीड येथील विश्व हॉस्पिटलमध्ये शनिवारी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ञ (ओन्कोसर्जन) डॉ. आशिष बांगर करणार तपासणी
बीड येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर विशाल पिंगळकर यांच्या विश्व हॉस्पिटलमध्ये शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी भव्य कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर आशिष बांगर रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिराचा लाभ बीड जिल्हयासह मराठवाड्यातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन विश्व हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विशाल पिंगळकर यांनी केले आहे.
पुणे येथील ससून रुग्णालयात वैद्यकीय सर्जरी विभागात काम करणारे न्युरोसर्जन डॉ. विशाल पिंगळकर यांनी बीड सारख्या शहरात विश्व हॉस्पिटलच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वीपासून रुग्णसेवा सुरू केली आहे. डॉक्टर पिंगळकर यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि रुग्णाप्रती असलेला आदरभाव यामुळे या रुग्णालयात न्यूरोसर्जरीसाठी रुग्णांची गर्दी होत आहे. आतापर्यंत हजारो रुग्ण येथून ठणठणीत होऊन परत गेले आहेत. रुग्णांलयाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत असल्याने रुग्णांना आणखी काय सेवा देता येतील याविषयी डॉक्टर पिंगळकर यांचे नेहमीच प्रयत्न असतात. त्याच अनुषंगाने त्यांनी आपल्या विश्व हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे नामांकित कॅन्सर तज्ञ डॉक्टर आशिष बांगर यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डॉक्टर आशिष बांगर हे महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले डॉक्टर आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांना कॅन्सर मधून बरे केले आहे. असे उच्च दर्जाचे कॅन्सर तज्ञ बीड येथे येऊन रुग्णांची तपासणी करणार असल्यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे. शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिबिरासाठी बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन विश्व हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विशाल पिंगळकर यांनी केले आहे. बीड येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. अविनाश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न होणार आहे. डॉक्टर अविनाश देशपांडे बीड येथील अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यासू शल्य चिकित्सक आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांना सेवा देऊन बीड जिल्ह्यामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होत असल्याने या शिबिराला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले या शिबिरात कोणी यावे?
१) शरीरावर गाठी किंवा गोळा असलेला रुग्ण
२) गर्भाशय आणि अंडकोषाच्या गाठी असलेला रुग्ण
३) न भरणारी जखम असलेला रुग्ण
४) गळ्याच्या गाठी, थायरॉईड, पॅराटीड ५)छातीच्या गाठी असलेला रुग्ण
६) तोंडातील न भरणारी जखम असलेला रुग्ण
७) ना दुखणारी परंतु वाढत राहणाऱ्या हातापायाच्या गाठी
८) कॅन्सरचे निदान झालेले रुग्ण