17.3 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. कांदा खरेदी बाबत शासनाचा काय निर्णय..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. कांदा खरेदी बाबत शासनाचा काय निर्णय..

बीड प्रतिनिधी – कांदा खरेदी बाबत शासनाने शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेतला आहे. कांदा खरेदी बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. राज्य शासन तसेच केंद्र शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत सुखदुःखात होऊन जाते. तसेच फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा राज्य सरकारने जाहीर केले होते. तसेच यावर्षी सुद्धा शासनाने शेतकऱ्यांसाठी चा चांगला निर्णय पुन्हा एकदा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक निर्णय तसेच सुखदुःखामध्ये राज्य सरकार सामील होतात. कांदा प्रश्न देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नीदेखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ वाढविण्यात येणार आहेत.

केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा २४१० रुपये क्विंटल दराने नाफेड खरेदी करणार असून हा ऐतिहासिक निर्णय असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील कांदा प्रश्नाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

निर्यातीसाठी कंटेनरमध्ये असलेला कांदाही नाफेड खरेदी करणार असून गरज भासल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य करण्याची ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. लासलगाव, मनमाड, आळेफाटा तसेच नाशिक जिल्ह्यातील इतर ठिकाणीही नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक घेऊन या प्रश्नी ठोस पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. कांदा साठवणुकीसाठी शीतगृहांची आवश्यकता आहे. असे झाल्यास साठवणुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यासाठी तातडीने दोन तीन पर्यायांवर पणन विभागाने विचार करावा, तसेच आवश्यकता भासल्यास खासगी कंपन्यांचा सहभाग घ्यावा, असेही निर्देशही दिले आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!