वडकी – पुणे येथे “मेरी माटी मेरा देश “ अभियान
गितांजली लव्हाळे वानखडे वडवणी प्रतिनिधी :-
आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्स्तवनिम्मित दिनांक ९ ऑगस्त ते दिनांक ३० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण भारत देशभर मेरी माटी मेरा देश, या अभियानांतर्गत मातीला नमन , वीरांना वंदन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे .
या निमित्ताने झील कांता इंटरनाशनल सोशल फौऊडेशनच्या व राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंच महाराष्ट्र यांच्या वतीने देशासाठी अमुल्य योगदान देणाऱ्या माजी सैनिक बांधवांचा विशेष सत्कार ,पंचप्राण शपथविधी, वृक्ष लागवड , गरजू व गरीब मुलांसाठी शालेय साहित्य वाटप व देशभक्तीपर कवितांची मेजवानी हे कार्यक्रम दिनांक12/08/2023 रोजी वेळ दुपारी १ वाजता स्थळ परशुराम आबाजी जगताप आश्रम शाळा , वडकी पुणे येथे आयोजित केले होते. सदर कार्यामास प्रमुख पाहुणे मा.श्री सुनील सांखला व सृष्टी युवा फाऊंडेशन च्या🌴 एक झाड माझे एक हात मदती चे मा. श्री. राजेश भोईटे यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यामाच्या वेळी भारतीय लष्करी माजी सैनिक मा.श्री. दिनकर डुबले , मा.श्री विजय दळवी तसेच सृष्टी युवा फाऊंडेशन च्या एक झाड माझे एक हात मदती चा यात विशेष कार्य करणारे सेवा निवृत्त सैनिक *मा. श्री. नानासाहेब मेहेर व मा श्री .मनोज शेजवळ यांचा सन्मान चिन्न देवून विशेष सत्कार करण्य्यात आला , मा.श्री.मनोज शेजवळ, मा.दिनकर डुबले यांच्या वतीने विशाल डुबले महिला बालकल्याण अधिकारी मा.श्री. आनंद राठोड यांचा संविधानाची प्रत देवून सत्कार करुन त्यांच्या हस्ते व मान्यवरांचा हस्ते शालेय विद्यार्थी यांना शालेय वस्तू चे वाटप करुन मा बीबीशन पोटरे , (कविराज) मा सुनील सांकला सेवा निवृत्त सैनिक निसर्ग प्रेमी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपन करुन *झाडे लावा 🌳झाडे जगवा*पाणी आडवा पाणी जिरवा 💧 व *माझी माती माझा देश* या अंतर्गत देशाच्या प्रगतीसाठी कर्तव बजावाण्यासाठी हातात माती घेवून या मातृभूमीस साक्ष मानून सर्वानी पंचप्रण शपथ घेतली . सुजलाम सुफलाम देश हमारा हि उत्तम अशी देशभक्ती पर कवितेचे सादरीकरण कवी श्री. सुरेश धोत्रे यांनी सादर केले तसेच इतरहि कवींनी उत्तम रित्या देशभक्तीपर कवितेचे सादरीकरण केले *झील क्रांती इंटरनेशनल सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्रेमिला तलवाडकर यांनी या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी या साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कारण ते उदया चे भारताचे भविष्या आहे. या कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या शाळेचे सर्व विद्यार्थी व मा.उपमुख्याध्यापिक मा श्री .रामराजे मोराळे सर मा. श्री. सुधीर पाटील सर व तसेच सर्व शिक्षक यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन दिली .अशाप्रकारे अतिशय प्रेरणावर्धक उपक्रम संपन्न झाला. व या कार्यकमाचे सूत्रसंचालन मा.श्री राजीव सगर यांनी केले तसेच आभार सृष्टी युवा फाऊंडेशन चे विश्वस्त मा. श्री. राजेश भोईटे यांनी केले.