गुरूकुल वडवणी तालुक्याची कार्याकारणी जाहीर..
अध्यक्ष पदी गोरख दराडे सर व उपाध्यक्ष बाबुराव म. सौंदणे
गितांजली लव्हाळे वडवणी प्रतिनिधी :-महाराष्ट्र गुरुकुल शिक्षण व संशोधन परिषद वडवणी ता.वडवणी जि.बीड आज संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष म्हणून श्री.गोरख दराडे सर तर उपाध्यक्ष म्हणून श्री. बाबुराव महाराज सौंदणे (गुरुजी) व सचिव श्री.गोपीनाथ ढेरे सर तसेच कोषाध्यक्ष श्री.अंकुश ईतापुरे सर समन्वयक श्री.अमोल राठोड सर यांची निवड करण्यात आली .
वडवणी तालुक्यांतील गुरूकुल संघटना ची कार्यकारणी ऊत्सहात पार पडली ..सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिलेली आहे. ती मी निस्वार्थ आणि प्रमाणिकपणे पार पाडण्याचे प्रयत्न करील आपल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही .असे मी आज सर्वांना ग्वाही देतो वडवणी शहरांमध्ये फारसे शैक्षणिक वातावरण नसताना देखील सर्व गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही ऊसतोड मजुरांच्या आणि गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या मुलांना अल्प दरामध्ये चांगल्या प्रतीचे शिक्षण देण्यासाठी मदत करत आहोत तालुक्यातून जे विद्यार्थ्यांचे लोंडे अंबाजोगाई, बीड, लातूरकडे जातात ते थांबवण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या प्रतीचे शिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना वडवणी शहरात देण्यासाठी प्रयत्न केले आहेत .आणि करत राहुत.सर्व गुरुकुल संचालकांनी माझी गुरुकुल संघटनेच्या वडवणी तालुकाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. .