दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त जेष्ठ पत्रकार संजय अवटे यांचे व्याख्यान..
उपस्थितीचे ॲड. पाटील, थोरात यांचे आवाहन
वडवणी प्रतिनिधी :-दिवंगत लोकनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त सोमवारी (दि. १४) ‘लोकशाही व पुढील आव्हाने’ या विषयावर जेष्ठ पत्रकार व साहित्यीक संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. दिवंगत विलासराव देशमुख प्रतिष्ठानने व्याख्यानाचे आयोजन केले असून उपस्थितीचे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. सुनील थोरात, कार्याध्यक्ष ॲड. राज पाटील यांनी केले.
दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी दिवंगत विलासराव देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. या वर्षी साहित्यीक व पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे लोकशाही व पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी (ता. १४) येथील नगर रोडवरील हॉटेल निलकमल येथे दुपारी दोन वाजता होणाऱ्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण असतील. तर, माजी आमदार राजेंद्र जगताप, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोकराव मुंडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यशवंतराव पाटील, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मुख्य कार्यकारी अधिकारी जी प बीड श्री अविनाश पाठक,पत्रकार दत्ता देशमुख, पत्रकार संजय मlलानी, यांची उपस्थिती असेल. व्याख्यानास उपस्थितीचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲड. राज पाटील यांनी केले.