बीडमध्ये रविवारी सरपंचांची कार्यशाळा..
पद्मश्री पोपटराव पवार, दीपाताई मुधोळ, अजित पवार, दत्ता काकडे यांची उपस्थिती..
जिल्ह्यातील सरपंचांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – ॲड राज पाटील.
वडवणी प्रतिनिधी :- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आणि जि. प. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जिल्हा सरपंच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सरपंच परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पत्र पाठवून या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ग्रामविकासातील अग्रणी व्यक्तिमत्व पद्मश्री पोपटराव पवार, बीडच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस, ग्रामविकासातील अभ्यासक शरद बुट्टे पाटील हे उपस्थित राहणार असून बीड जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे बीड जिल्हा अध्यक्ष ॲड राज पाटील यांनी केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत. बीड जिल्हा नवनियुक्त सरपंचांचे प्रशिक्षण यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, मनरेगा अंतर्गत कामांचे नियोजन, पंचायत राज व विवीध योजनांची माहिती, प्रत्यक्षात काम करतांना येणाऱ्या अडचणी इत्यादी बाबी चे महत्व पूर्ण मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे. काम करताना सरपंचांना येणाऱ्या अडचणी, सरपंचाचे अनुभव,विकास योजना बाबतीत सरपंचांना बोलण्याची संधी या कार्यशाळेत लाभणार आहे. बीड जिल्हाच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी मा. दीपाताई मुधोळ मुंढे मॅडम व जिल्हा परिषद बीड चे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार साहेब यांच्या कार्याचा गौरव सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या वतीने पद्मश्री श्री पोपटराव पवार साहेब कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद बीड चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव सोळंके साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोकाटे साहेब पंचायत राज विभाग, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप काकडे साहेब सामान्य प्रशासन विभाग,उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुंढे साहेब ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरपंच कार्यशाळेला बीड जिल्यातील सर्व सरपंच व प्रशासक, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहून अभ्यास कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष ॲड राज पाटील यांनी केले आहे.