जि.प.प्रा शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी..!
- जि.प.प्रा शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी..!
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,१: बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे जि.प.प्रा शाळा या ठिकाणी लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
- जयंती निमित्त शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर,जाधव सर,शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त सर्वांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
- प्रभावी लेखणीतून,अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा प्रखरपणे मांडणारे साहित्यिक,लेखक,समाजसुधारक, लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट या ठिकाणीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
- जयंतीनिमित्त गावचे सरपंच पप्पू जगताप,पोलीस पाटील विलास सोनवणे,संगणक चालक अंगद घोरपडे,सोमनाथ टेकडे,आकाश वाघमारे,सुरेश घोरपडे,रघुनाथ लोंढे,सुखदेव वाघमारे,अंगद वाघमारे,ज्ञानेश्वर वाघमारे,किशोर वाघमारे,लखन लांडगे यावेळी उपस्थित होते.
- सरपंच पप्पू जगताप यांनी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती निमित्त लोकशाहीराला अभिवादन केले.तसेच उपस्थित सर्वांनी लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
error: Content is protected !!