शासन नियमानुसार शाळांच्या वेळा निश्चित करून दप्तराचे ओझे कमी करा. – मनोज जाधव
बीड प्रतिनिधी – बीड शहरातील एका विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समाजाला आणि प्रशासनाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. विद्यार्थांना त्यांच्या क्षमते पलिकडे शैक्षणिक भार देणे कितपत योग्य आहे? असा सवाल आता विचारला जात आहे. या सर्व घटनेकडे पालकांनी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे आणि प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे या संदर्भात आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंढे यांना शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी निवेदन दिले या वेळी सुहास पाटील , नवनाथ प्रभाळे, सचिन कोटुळे आदी उपस्थित होते तर निवेदनावर सामजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांचीही स्वाक्षरी होती.
सतत अभ्यास आणि व्यस्त दिनक्रमामुळे विद्यार्थी मानसिक तनावाखली जात आहेत. यासाठी उपाययोजना करणे गाजेचे आहे. सकाळी सहा ते रात्री सात वाजे पर्यंत विद्यार्थी फक्त शाळा आणि ट्युशन यातच गुरफटलेले असतात त्यानंतर होम वर्क वेगळा यातून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व करत असताना जिल्ह्यातील अनेक शाळा या शासनाने निर्धारित केलेल्या वेळे पेक्षा जास्त वेळ भरवल्या जातात. या मुळे विद्यार्थी सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी तीन पर्यंत शाळेत असतात या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिक यांना वेळोवेळी निवेदनातून आणि इतर मार्गाने अवगत केले होते परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. आज जो या विद्यार्थिींनीचा जीव गेला याला जबाबदार कोण असा प्रश्न जिल्हा भरात विचारला जात आहे. शिक्षणाची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारे शिक्षण विभाग याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसल्याने अश्या घटना घडत आहेत. शिक्षण विभागाने वेळीच काही उपायोजना केल्या असत्या तर कदाचित या विद्यार्थिनीचा जीव वाचला असता तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी शिकवण्या सुरू आहेत. या शिकवण्या रविवारी देखील परीक्षेच्या नावाखाली सुरू असतात त्या रविवारी बंद ठेवण्यात याव्यात आणि मुलांच्या दप्तराचे ओझे हे देखील शासन नियमा नुसार ठेवावे . या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.