30.3 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन; जिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर..

  • इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन; जिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर..
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
  • अलिबाग, दि.21 :- दि.19 जुलै 2023 रोजी खालापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मौजे चौक-नानिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील मौजे इरशाळवाडी ता.खालापूर येथे दरड कोसळून मोठयाप्रमाणात जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाचे व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते क्रमांक व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
  • ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर :- 38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.
  • ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे, मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!