23.3 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए’च्या बीड जिल्हा अध्यक्षपदी मा बाळासाहेब वाघमारे व उपाध्यक्षपदी मा कृष्णा वंजारे यांची निवड..!

  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए’च्या बीड जिल्हा अध्यक्षपदी मा बाळासाहेब वाघमारे व उपाध्यक्षपदी मा कृष्णा वंजारे यांची निवड..!
  • निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  • बीड दि 18 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बाळासाहेब पवार यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा अध्यक्ष पदी मा.बाळासाहेब वाघमारे आणि बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी मा.कृष्णा वंजारे यांची निवड सर्वानूमते करण्यात आली आहे.मुंबई येथे दि.15 जूलै रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हि घोषणा करण्यात आली आहे.या पुर्वी बाळासाहेब वाघमारे यांनी भारतीय दलित पॅंथर मध्ये बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तर कृष्णा वंजारे यांनी भा.ज.पा. दलित आघाडी बीड जिल्हा सरचिटणीस पदी काम पाहिले आहे. तसा दोघांनाही राजकीय चांगला अनुभव आहे. याच अनुभवाचा फायदा त्यांना बीड जिल्ह्यात दांडगी तरुण फळी उभा करण्यासाठी होणार असल्याचे बीड जिल्ह्यात चित्र दिसत आहे. नूतन जिल्हा अध्यक्ष आणि उपअध्यक्ष यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
  • तसेच या कार्यक्रमासाठी, महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. दादासाहेब ओव्हाळ, महाराष्ट्र सचिव मा. राजेंद्र आठवले, मा. अशोक ससाने, मा. अरुण भिंगारदिवे, कार्यालय प्रमुख तानाजी मुसळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.आप्पा गायकवाड, संपर्क प्रमुख मराठवाडा मा. प्रकाश वेदपाठक, मा.आम्रपालीताई गजशिव महिला आघाडी, मराठवाडा कार्याध्यक्ष मा.बबन जंगले, मराठवाडा संघटक मा.संजय तेलंग, अंबाजोगाई ता.अध्यक्ष महिलाआघाडी मा.उमाताई गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष मा.सचिन खरात,मा.रविंद्र कदम, लातूर जिल्हा संघटक मा नागेश बन्सोडे, गणेश भोसले, आकाश डोळस,राजकूमार काळे, दिपक गायकवाड, अनिल विर, प्रल्हाद डोंगरे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!