13.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता शिंदेंना  अटक..!

माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता शिंदेंना  अटक..!

निवासी संपादक-दिपक वाघमारे

बीड दि.11 : ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याप्रकरणी माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 3 जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सर्वच संचालक मंडळ फरार होते, दरम्यान पोलीसांनी सर्वांचे खाते होल्ड करत मुख्य शाखेला सील केले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिभाऊ खाडे व त्यांच्या टिमने मंगळवारी  अध्यक्षा अनिता बबन शिंदे यांना अटक करत न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून अनेक ठेवीदारांना आकर्षित करत आलेल्या ठेवी इतरत्र गुंतवल्यामुळे बँक अडचणीत आली. त्यानंतर ठेवी परत मिळवण्यासाठी एकदाच सर्व ठेवीदारांनी गर्दी केली, त्यामुळे ठेवी परत करणे अशक्य झाले. अनेकांना काही प्रमाणात ठेवी परतही मिळाल्या. राहिलेल्या ठेवीदारांना आठवड्याची, नंतर महिन्याची अशी मुदत देण्यात आली. परंतू नेहमीच तारीख पे तारीख मिळत असल्याने 3 जुलै रोजी अ‍ॅड.संतोष जगताप यांनी शिवाजीनगर पोलीसात धाव घेतली. माँसाहेब जिजाऊ बँकेचे बबन शिंदे यांनी बँकेतील ठेवी गैरमार्गाने वापरत स्वतःच्या स्वार्थासाठी हा पैसा खर्च केला. यामुळे ठेवीदारांना पैसे देण्यास बँक असमर्थ झाली असून कार्यकारणीच्या मनमानीमुळे मात्र कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. त्यावरुन अध्यक्षा अनिता बबन शिंदे त्यांचे पती बबन विश्वनाथ शिंदे, मुलगा मनिष बबन शिंदे, जावाई योगेश करांडे, व्यवस्थापक अश्विनी सुनील वांढरे यांच्यासह बँकेच्या सर्व कार्यकारी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीसांकडून प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलीस अधीक्षक नदंकुमार ठाकूर,अप्पर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरीभाऊ खाडे हे तपास करत आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!