15.2 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

करजखेड्यातील लाभार्थ्यांचे सेलू तहसील समोर अमर उपोषण

करजखेड्यातील लाभार्थ्यांचे सेलू तहसील समोर अमर उपोषण

परभणी जिल्हा प्रतिनिधी : लाखन शेरे

सेलू तालुक्यातील करजखेडा गावठाणाचे पुर्नवसन सेलू गट क्र.46 वाकी ता.सेलू तहसिल कार्यालयाने प्लॉट वाटप करुन दिलेले आहेत. प्लॉट नं. 1ते 69 या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. परंतू लाभार्थ्यांना अद्याप ताबा देण्यात आलेला नाही व रोडच्या उत्तरेकडे बाजूस देखील अतिक्रमण झालेले आहे व गावात स्मशानभुमी देखील नाही त्या करिता. आमरण उपोषण करण्यात आलेले.आहे. यावेळी गावकऱ्यांच्या निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामुळे मौ. करजखेडा, ता. सेलू गावठाणाचे पुर्नवसन सेलू गट क्रं. 46 वाकी, ता. सेलू तहसिल कार्यालयाने प्लॉट वाटप करुन दिलेले आहेत. क्रं. 01 ते 69 या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. परंतू लाभार्थ्यांना अद्याप ताबा देण्यात आलेला नाही व रोडच्या उत्तरेकडील बाजूस देखील अतिक्रमण झालेले आहे व गावास स्मशानभुमी देखील नाही.

तरी मा. साहेबांना विनंती करण्यात येते की, उपरोक्त प्लॉट नं. 01 ते 69 हे ज्या लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहे त्यांना तात्काळ वाटप करण्यात यावे. तसेच सदरील ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण हे तात्काळ काढून उपरोक्त प्लॉट हे मोकळे करण्यात यावे. तसेच गावास नसलेली स्मशानभुमी ची जागा निश्चित करुन आम्हां गावकऱ्यांना देण्यात यावी. यावेळी आमरण उपोषण साठी बसलेले गावकरी मंडळी सरपंच उत्तम सोनटक्के उपसरपंच भाऊसाहेब झोल माझी उपसरपंच सुनील झोल राजू हातागळे मुरलीधर हातागळे सुरेश हाताकडे प्रल्हाद हातागळे महादेव शेजुळ संदीप हातागळे गंगाराम हातागळे बाबासाहेब हातागळे नंदाबाई हातागळे आम्रपाली हातागळे जानकाबाई हातागळे संजय हातागळे सुनील झोल गोविंद झोल राजू हातागळे राजेभाऊ झोल दिनकर शेजुळ आधी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!