12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

लेक सरपंच तर बापच हाकतो गावचा कारभार ?

लेक सरपंच तर बापच हाकतो गावचा कारभार ?

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील जैतळवाडी येथील अगदी कमी वयामध्ये सरपंच झालेले हनुमान केसकर पुणे या ठिकाणी शिक्षण घेतात तर गावचा कारभार हे हनुमान केसकर यांचे वडिलच हाकतात असे चित्र स्पष्ट होताना पहायला मिळत आहे. एका कामासाठी कॉल केला असता सरपंच असलेले हनुमान केसकर यांनी सांगीतले तुम्हाला उद्या कॉल करुन सांगतो वडिलांचा निर्णय घेउन, तर या वरून स्पष्टच पहायला मिळत आहे की लेक सरपंच तर बापच हाकतो गावचा कारभार. सरपंच हनुमान केसकर यांचे वडील राजाराम केसकर यांना पत्रकाराने विचारले सरपंच तुम्ही का मुलगा ? तर त्यावर राजाराम केसकर यांनी तुला काय करायचे आहे अश्या भाषेमध्ये म्हटले आहेत, तो अभ्यास करत असतो त्याला कॉल करु नका असं सुध्दा यावेळी सरपंच हनुमान केसकर यांचे वडील राजाराम केसकर यांनी म्हटले आहे.

सचिन आमटे नामक शिवसंग्राम कार्यकर्त्याला Noc पाहिजे होती तर थेट अनेक वेळा भेटून, बोलुन, Noc मागितली. अनेक वेळा कॉल केल्यामुळे कार्यकर्त्याचा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आला आहे. यावरच सरपंचाच्या वडिलांनी Noc नाही असे म्हटल्याचे माऊली न्युज शी बोलताना सचिन आमटे यांनी सांगीतले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!